Sunday, 25 March 2012
'' गेले ते दिवस '' ''राहील्या त्या फक्त आठवणी "
इवल्याशा चिमुकल्या डोळ्यांनी
छोटेसे जग पाहीले |
जन्माला आल्या-आल्या प्रथम
माऊलीस माझ्या पाहीले ||
तीचेच बोट धरून मी माझे
पहिले पाऊल टाकले |
तीच्याच शिकवनीतून मी
पहिले"आई"शब्द उच्चारले ||
मातृत्वाच्या संस्कारांचा
स्वाद किती गोड होता |
आईच्या त्या हाकेमद्ये
आडला माझा श्वास होता ||
आज जेव्हा ठेच लागते
तेव्हा तूझीच आठवन येते |
डोळ्यातले ते आश्रु पूसायला
पदर घेवून पूढे येते ||
तू नसताना काय सांगु
कुठे तूझी कमी भासते |
जशी पावला पावलावरती
तूझीच आठवन मनी आसते ||
जेवताना आजूनही आठवतो
तू भरवलेला प्रत्येक घास |
कसं सांगु आई भासतो
आजही तो भोकाडीचा भास ||
तूझ्याच डोळ्यांमद्ये मी
माझे सारे जग पाहीले |
जन्माला आल्या-आल्या प्रथम
माऊलीस माझ्या पाहीले |
Friday, 23 March 2012
तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता.
तर हि गोष्ट आहे..संत एकनाथांची एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन त्यांच्यावर थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारलीआणि बाहेर आले.यवन परतथुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळाघडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न ??ाही बोलले.शिक्षकांनी हि गोष्टवर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :१)- नाथ किती महान होते ते कळत. २)- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते.३)- माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत. ४)- एखाद्याला जिंकायचं असेल तरप्रेमाने जिंका. ५)- रागावून त्रास तुम्हालाच. ६)-शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वराच आहे.७) दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे. अशी एकसोएक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत,त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण,नाथांची हि गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस..,“कि हिंदूस्थानी (भारतीय) समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे“.शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?,नाथांना चूक ठरवतोस..?”.तो विद्यार्थी म्हणाला, “नाही गुरुजी. मी नाथांना चूक ठरवणारा कोण..?,नाथ जे काहीवागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण.?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदूस्थानी(भारतीय) समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाहीनाथ संत असले तर तो हिंदूस्थानी (भारतीय) समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता.नाथांनी जस त्याचं कामकेल तस हिंदूस्थानी (भारतीय) समाज नी त्याचं काम करणयोग्य होत.न कि, नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण.हे बाणेदारउत्तर देणारा तो विद्यार्थी होता. '' स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर '' !! जय हिंद, गोष्टीच तात्पर्य::-''आपल्याभारत मातेच्या दुर्दैवाने आज स्वातंत्र्या नंतर 64 वर्षांनंतर देखील हिंदूस्थानी(भारतीय) समाज निद्रिस्त आणि निष्क्रीयच आहे.आज हि आपल्याहिंदूस्थानी (भारतीय) समाजाची तसेच राज्यकर्त्यांची उदासीन-कचखाऊ वृत्ती आणि विदेशींचे अनावश्यक लांगुलचालन करण्याची प्रवृत्ती कायम आहे.अजूनही वेळीच सावध होवून विदेशींचे अनावश्यक लांगुलचालन अतितात्काळ थांबवून प्रत्येक वाईट कामाला आणि बेकायदेशीर कृत्याला वेळीच कडाडून विरोध केलाच पाहिजे.ह्या पुढे प्रत्येक भारतीय नागरिकाने आजीवन राज्यघटनाआणि प्रचलित कायद्यांच्या चौकटीतराहून '' प्रचलित सर्व क़ायदे आणि नीति-नियम यांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन प्रत्येकाने न चुकता आप-आपले कर्तव्यपालनकरणे अशा प्रकारे '' अत्यंत जबाबदार-सुजाण नागरिक '' बनणे तसेच आपली नागरिकत्वाची सर्व कर्तव्ये आणि संपूर्ण जबाबदार्या अत्यंत काटेकोरपणे तंतोतंत पार पडणे अत्यावश्यक आहे. ''
Subscribe to:
Posts (Atom)