Sunday, 25 March 2012
'' गेले ते दिवस '' ''राहील्या त्या फक्त आठवणी "
इवल्याशा चिमुकल्या डोळ्यांनी
छोटेसे जग पाहीले |
जन्माला आल्या-आल्या प्रथम
माऊलीस माझ्या पाहीले ||
तीचेच बोट धरून मी माझे
पहिले पाऊल टाकले |
तीच्याच शिकवनीतून मी
पहिले"आई"शब्द उच्चारले ||
मातृत्वाच्या संस्कारांचा
स्वाद किती गोड होता |
आईच्या त्या हाकेमद्ये
आडला माझा श्वास होता ||
आज जेव्हा ठेच लागते
तेव्हा तूझीच आठवन येते |
डोळ्यातले ते आश्रु पूसायला
पदर घेवून पूढे येते ||
तू नसताना काय सांगु
कुठे तूझी कमी भासते |
जशी पावला पावलावरती
तूझीच आठवन मनी आसते ||
जेवताना आजूनही आठवतो
तू भरवलेला प्रत्येक घास |
कसं सांगु आई भासतो
आजही तो भोकाडीचा भास ||
तूझ्याच डोळ्यांमद्ये मी
माझे सारे जग पाहीले |
जन्माला आल्या-आल्या प्रथम
माऊलीस माझ्या पाहीले |
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment