Sunday, 8 April 2012
आपला सुर्य
आपण आपल्या मनाला समजावत बसावयाचे ! उधाचा दिवस चांगला उजाडेल , निदान आजच्या पेकश्या, वाईट नसनारा! पन छे, कालपेकश्या हि, नको असलेला, तासन् तास रेंगाळणारा,सुतक्या सारखा, असा दिवस हमखास उजाडणार,लवकर नसंपण्यासाठी, त्याला हाकलणार कसे, अन् कुठे! सिंदबाद च्या पाठीवरील चीवटम्हातारी सारखा , सदैव आपल्या मनावर पगडा ठेवुन, जगणेच काय,पण मरणे सुध्दा नकोसे, करनारा, आपण वाट बघतबसनार...असा दिवस मावळण्याची. अन् उध्याचा,दिवस, चांगला उजाडेल याची...... मनाला समजावीत् उध्याचा सुर्य़ आपल्या साठी उगवणार आहे......केवळ आपल्यासाठी............. भास्कर पवार “करीयर” प्लॅनिंग प्लॅनिंग करतांना आयुष्यच जगावयाचच राहुन गेल !! बेरीज कधी जमलीच नाही वजाबाकीच सदैव होत गेली !! वेळेच भान ठेवता ठेवता--- वेळच कायमची निघुन गेली !! हंसु हंसु म्हणताना आसवांनीच सरशी केली ----- आयुष्याचे आरेखन करता करताबरच काही बरच काही राहुन गेल--- बरंच काही ----सारचकाही राहुन गेल ----राहुन गेल ----- मनासारख जगण्याचराहुन गेल--- स्वप्नच सार विरुन गेल विरुन गेल-- तो एक उनाड दिवस आयुष्यात कधि आलाच नाही कधि आलाच नाही ‘करीयरच्या’ उंच जाणा-या ग्रॉफच्या--- तळाला सुध्दां खरं जगण्याचा मागमुसही दिसला नाही-- दिसला नाही --- भास्कर रं. पवार ८ मे २००८. !!!!! चालत राहीलो !!!!! धोपट मार्ग सोडु नको, गिरवतागिरवता सरळ मार्गच चालत राहीलो !!! आडवाटेच्या -वाटेलाही कधी नाही गेलो आजुबाजुची दाट दाट हिरवळ !!! खुणावत राहीलीक्षणा-- क्षणाला पण सरळच चालत राहीलो चालतच राहीलो मळ्लेल्या अनेक पाऊल वाटा आल्या नि बोलावत राहील्या बोलावत राहील्या ------ मीदिसेनासा होईपर्यंत ------ मागेवळुन पहाण्याचे हि धैर्यच मला झाले नाही----- तसाच ----अगदी तसाच---- चालत राहिलो ---चालत राहिलो आयुष्याची वाळु रस्ताभर पेरत पेरत जेंव्हा भान आल---तेंव्हा ओंजळीतली वाळुही संपली होती आयुष्य जगलो होतो----- पण जगल्या `` जगल्या विनाच ''!!!!!!
Labels:
आपला सुर्य
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment