Saturday, 7 January 2012

अज्ञान, आळस, अहंकार, कुसंगतीया शत्रूपासून सावधान!

अहंकार आणि कुसंगती हे प्रगतीआड येणारे शत्रू आहेत. यासाठी उद्योगशीलता, स्वाध्याय व वृद्धोपसेवा यांच्याशी मैत्री करण गरजेचआहे, असे ठाम मत प.पू. आचार्य किशोरजी व्यास यांनी "तुच तूझ्या जीवनाचा शिल्पकार' या विषयावरील व्याख्यानाच्या तिसऱ्या दिवशी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहातबोलताना व्यक्त केले.
जो दूसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, असे सांगून जीवनात मी नेमका कोठे आहे याचा शोध धेणे गरजेचा आहे हे सांगत मी एका बॅंकेच्या उद्‌घाटनाला गेलो. अगोदर कम्पाउंडमध्ये गेलो, त्यानंतर इमारतीमध्येगेलो, नंतर काऊंटरमध्ये गेलो, नंतर काऊंटरच्या मध्ये गेला. काऊंटरच्या बाजूस लॉकरजवळ नेल, लॉकरमधल्या अनेक कप्प्यापैकी एका कप्यात धनराशी ठेवायला सांगितली. या पद्धतीने माणसाच्या जीवनात अनेक कप्पे असतात आणि त्यात मी असता. दूसऱ्या भाषेत या दालनाला कोष असे म्हणतात. आणि ही दालन ओलांडण्याची प्रक्रिया म्हणजे साधना होय. प्रयोग, शिस्त, व विवेकाच्या जागृतीच्या कोषात काम करत असताना विवेकाचा दिपस्तंभ महत्वाचा आहे. माझ्या जीवनात माझ्या आड येणारे शत्रू अगोदर कळायला हवेत. हेसांगत असताना आचार्य किशोरजी व्यास म्हणाले की, अज्ञान हे सर्वात मोठा शत्रू आहे. माझ्या जीवनाचे महत्व जर मला कळत नसेल तर मीअपयशी ठरतो. मला माझ्या जीवनाचे शिल्प यशस्वी करण्यासाठी मला अज्ञान घालवायला हवं. आणि त्या पाठोपाठ क्रमांक दोनचा शत्रू म्हणजे तो खूप आवडतो ते म्हणजे आळस. काम वेळेवर होत नाही, आळसामुळे माणसाचे जीवन मातीमोल होते. अशा परिस्थितीत काळ, काम व वेगाचे गणित बसवत आळस झटकून प्रलोभनाच्या आहारी न येता आपल्या ध्येयाकरिता वेडं व्हावं लागतं. बऱ्याच लोकांना चर्चा, गप्पा, टाईंमपासमध्ये आनंद येतो. आळस हा मित्रासारखा दिसतो पण तो जीवन पोखरून उद्‌वस्त करतो. आपल्या शिल्पाआड येणारा नंबर तीनचा शत्रू म्हणजे अहंकार. दुर्योदयानातमध्ये अहंकार नसता तर आयुष्याचं सोन झाल असतं. आपले दोष आपल्याला कोणी सांगणार नाही म्हणून आपण आत्मनिरीक्षण करायला हवं. अहंकारासंदर्भात रावणाचं उदाहरण देत त्यांनीरावणाच्या अहंकारापोटी लंकेची राख झाली आणि दुर्योधनाने वंश उद्‌‌‌ध्वस्त केला. जीवनाचेशिल्प उभे करताना विचार करायला हवा. आणि हे शत्रू मित्रासारखे वाटतात आणि केसाने गळा कापतात असे सांगून माणसाने कुसंगती टाळायला हवी. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो याचा संदर्भ देत किशोरजी व्यास म्हणाले की, आपण कोणाशी बोलतो, आपण कोणाशी चर्चा करतो याचा आपण विचार करायला हवा. कुसंगतीचे उदाहरण देत असताना एका मित्राने आपल्या मित्राला ड्रग्‌सची सवय लावली आणि तो डग्‌समध्ये कसा उद्‌ध्वस्त झाला हे त्यांनी सांगितल. माणसे कुसंगतीने नासवले जातात, उद्‌ध्वस्त होतात, असे सांगून कर्ण संदर्भात साहित्यिकांचे गैरसमज आहेत.कर्ण प्रवृत्ती ही फार वाईट आहे, असे सांगून दूर्योधन व शकुनी नितीने उमदा कर्ण मातीमोल झाला हे सांगत सांगत आचार्यजी म्हणाले, आजकालचे राजकीय नेते कार्यकर्त्यांना अनुदान देवून बटीक बनवतात. 1. दुर्योधन 2. दुशासन 3. शकुनी 4.कर्ण हे महाभारतातील चांडाळ चौकणी आहेत असे किशोरजी व्यास म्हणाले.
आपले शिल्प यशस्वी करण्यासाठी जीवनात मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार बनण्यासाठी माणसात उद्योगशीलता हवी. सावधानता हवी. उत्साह हवा. त्याचबरोबरस्वाध्यायशिलता, अभ्यास करायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभ्यास केलातो आपण दोन-तीन जीवनात करु शकणार नाही. देशावर कसं प्रेम करावे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकायला हवं. दुर्दैवाने बाबासाहेबांचे महात्म्य त्यांच्या अनुयायांना कळलेच नाही, असे सांगून वृद्धोपसेवा म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत, आपण राजकारणात असो, समाजकारणात असो त्या क्षेत्रातील अनुभवी वृद्ध लोकांच्या भेटी घेतल्या पाहिजेत, त्यांच्याकडून कांही शिकले पाहिजे. ख रा ीशश्रष ारवश हे म्हणणे शुद्ध मुर्खपणा आहे. आत्मश्रद्धा हे महत्वाचे रसायन आहे. मी ठरवलं ठरवलं ठरवलं ते झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. बघूत-करुत असं जमत नाही. आणिआतापर्यंत जगाचा इतिहास वेड्यांनीच घडवला. यासाठी आत्मश्रद्धा जागृत करुन सामर्थ्याने काम करायला हवं. झपाटलेला माणूस डोक्यात थैमान असते आणि मग तो यशस्वी होतो.
यावेळा युद्धातील एक उदाहरणदिलं. आता तुमचे मागचे दोर कापलेले आहेत. एकतर तुम्हाला डोंगरावरून खाली पडावं लागेल आणि मरावं लागेल किंवा लढत लढत मरावं लागेल हे सांगितल्यानंतर सैन्य ीशश्रष शपर्लेीीरसश ने कसे लढले हे सांगून आपले स्वप्न, आपलं शिल्प आपल्यासमोर दिसलं पाहिजे. आपण राजकीय, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या शिल्पाच आपण ध्यान केल पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. शत्रूंना दूर ठेवून स्वप्न पूर्ण होईपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत असेहीकिशोरजी व्यास म्हणाले.
यावेळा जगन्नाथजी डागा यांनी व्यायामशाळेस एक लाख रुपये देणगी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. पांडूरंगजी बाहेती यांनी आळंदी येथील गुरुकुलास 71 हजार रुपये दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार केला. यावेळा आचार्यजींचे स्वागत लक्ष्मीकांत सोनी, विजय जाजू, पांडूरंग मंत्री यांनी केले. पसायदानानंतर कार्यक्रम संपला. प्रास्ताविक लक्ष्मीकांत कर्वा यांनी केले. संचलन लक्ष्मीकांत सोनी यांनी केले.
सावधान !
लव्ह जिहादच्या माध्यमातून जे घडत आहे ते अत्यंत गंभीर,धक्कादायक व चिंता करण्यासारख असून मी समाजाच अन्न खातो, म्हणून मला राहवतनाही आणि आपल्याला जागृत करण्यासाठी लव्ह जिहादसारख्या दुष्ट प्रवृत्तीपासून आपला भाग, आपले गाव, आपले राष्ट्र वाचवणे गरजेचे आहेे, असे भावपूर्ण उद्‌गार आचार्य किशोरजी व्यास यांनी काढले.
गेल्या एक वर्षात कर्नाटकातील 35 हजार मुस्लिम युवकांनी आपल्या मुलींशी लव्ह जिहाद म्हणून लग्न केल. हा आकडा केरळमध्ये4500, साताऱ्याला चौकशी केली. अशाप्रकारच्या 40 घटना घडल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment