Friday, 6 January 2012

राष्ट्रीय कोण ?

राष्ट्र कसे बनते, राष्ट्रीय कोणाला म्हणावे, राष्ट्रस्वरूपाची आधुनिक विचारवंतांना मान्य झालेली संकल्पना कोणती, सर्व निकषांवर भारत हे हिंदू राष्ट्रच कसे ठरते, या हिंदूराष्ट्रात ख्रिस्ती व मुसलमान समाजाचे स्थान काय, हिंदू राष्ट्रजीवनाची ठळक वैशिष्टये कोणती आदी संबंधित विषयांचे विवेचन श्रीगुरूजींनी त्यांच्या ठिकठिकाणच्या भाषणांतून केलेले आहे. त्यापैकी 'भूमी' या राष्ट्राला आधारभूत असलेल्या पहिल्या घटकाचा विचार आपण थोडक्यात पाहिला आहे.
यानंतर विचार करावा लागतो तो त्या भूमीवर 'राष्ट्रीय' या नात्याने राहणाऱ्या लोकांचा. जगातील कोठल्याही देशात 'आव जाव घर तुम्हारा' अशी अवस्था नसते. त्या भूमीच्या पुत्ररूप समाजालाचराष्ट्रीय समजले जाते. मुसलमानांनी आणि इसायांनी जगात ठिकठिकाणी आक्रमणे करून अनेक राष्ट्रे मुळापासून नष्ट केली. कोटयवधी लोकांना आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावरठार मारले व त्यांचा वंशविच्छेद करून टाकला. तेथेवसाहती केल्या व जुन्या जीवनाशी संबंध नसलेली नवी राष्ट्रे - इस्लामी व इसाई राष्ट्रे - जन्माला घातली. त्यांना हिंदुस्थानात हेच करावयाचे होते, पण येथे ते हतबल ठरले व हिंदू समाज आणि त्याचे हिंदू राष्ट्र आजही जिवंत आहे.

No comments:

Post a Comment